top of page

“AMC School Eye Checkup Camp by Deesha Group: A Visionary Step for Children's Eye Health”

दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा अमरावती येथे म.न.पा. च्या

एका दिवशी 3 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

 

दिशा एज्युकेशन फाउंडेशन अमरावती द्वारा संचालित फिरते नेत्र चिकित्सालय मध्ये दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी अमरावती म.न.पा. प्रा. मराठी मुलींची शाळा क्रं. ८ रामनगर, म.न.पा. हिंदी शाळा क्रं. ८ बजरंग प्लॉट व म.न.पा. प्रा. मराठी शाळा क्रं. २० नवाथे नगर मध्ये विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.

Eye Checkup Camp Ram Nagar, AMC School No. 8.
Eye Checkup Camp Ram Nagar, AMC School No. 8.

या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १११ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या नेत्रतपासणी मध्ये चष्म्याचे योग्य नंबर काढून देण्यात आले. आपण आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो या साठी मार्गदर्शन करण्यात आले. काही रुग्णांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.

Eye Checkup Camp AMC School No. 20 Navhathe.
Eye Checkup Camp AMC School No. 20 Navhathe.

आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी म.न.पा. प्रा. मराठी मुलींची शाळा क्रं. ८ रामनगर, येथिल शाळेच्या मुख्यध्यापिका श्रीमति मंजुषा कल्हणे मॅडम, म.न.पा. हिंदी शाळा क्रं. ८ बजरंग प्लॉट चे मुख्याध्यापक श्री सखाराम कोरोटे सर व म.न.पा. प्रा.मराठी शाळा क्रं. २० नवाथे नगर च्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली दातीर मॅडम व सर्व शिक्षक मंडळी उपस्थित होते. तसेच दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, नेत्र चिकित्सक कु. प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

 

भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्ती देखील नेत्रदान करू शकतात. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते.



コメント


bottom of page