दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा म.न.पा प्रा. म. मुलींची शाळा क्र.२३, बडनेरा
व म.न.पा प्राथमिक शाळा क्र. २४ बडनेरा अमरावती, मध्ये १३२ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी
दिशा एज्युकेशन फाउंडेशन अमरावती द्वारा संचालित फिरते नेत्र चिकित्सालय मध्ये दि. १५ जानेवारी २०२५ रोजी बडनेरा, अमरावती येथे म.न.पा प्राथमिक मराठी मुलींची शाळा क्र.२३ व म.न.पा प्राथमिक मराठी शाळा क्र. २४ मध्ये विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.
या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १३२ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या नेत्रतपासणी मध्ये चष्म्याचे योग्य नंबर काढून देण्यात आले. आपण आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो या साठी मार्गदर्शन करण्यात आले. काही रुग्णांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.
आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी शाळा क्र. २३ चे मुख्याध्यापक श्री. राहुल वानखेडे सर व शाळा क्र. २४ च्या मुख्याध्यापिका श्रीमती.वर्षा पिंजरकर मॅडम व सर्व शिक्षक मंडळी उपस्थित होते. तसेच दिशा ग्रुपचे श्री.स्वप्नील अरुण गावंडे, नेत्र चिकित्सक कु.प्रणाली चांभारे, श्री.हिमांशू बंड, श्री.अनिल देशमुख, आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्ती देखील नेत्रदान करू शकतात. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते.
Commentaires