Chackuparambil Family Donated Eye of Late Aleyamma Chackuparambil in Deesha Eye Bank Yavatmal
- Himanshu Band
- Apr 15, 2022
- 1 min read
स्व. अलियम्मा जॉन चॅक्युपरमबिल यांचे दिशा आय बँक मध्ये नेत्रदान
यवतमाळ येथील रहिवासी स्वअलियम्मा जॉन चॅक्युपरमबिल याचे दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. चॅक्युपरमबिल परिवारावर सध्या दुःखाचा डोगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने चॅक्युपरमबिल परिवाराच्या सदस्यांनी अलियम्मा जॉन चॅक्युपरमबिल यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी यवतमाळ मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ आशिष पोटफोळे, यांनी मरोणत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे चॅक्युपरमबिल कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. चॅक्युपरमबिल परीवाला नेत्रदाना केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात श्री अनिल गायकवाड, श्री अतुल संगीतराव व चॅक्युपरमबिल परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. अलियम्मा जॉन चॅक्युपरमबिल यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.

मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा तासान पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामोळे मृत्यू नंतर ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरान कडून घेऊन घ्यावे.
コメント