दिशा एज्युकेशन फाउंडेशन अमरावती व स्व. अरुणाबाई भोरे स्मृतीप्रित्यर्थ, कारंजा लाड द्वारा कारंजा (लाड) येथे ११२ नागरिकांची नेत्र तपासणी
दिशा एज्युकेशन फाउंडेशन अमरावती व स्व.अरुणाबाई भोरे स्मृतीप्रित्यर्थ, कारंजा लाड द्वारा आयोजित फिरते नेत्र चिकित्सालय दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी श्री महावीर ब्रम्हचर्याश्रम जैन गुरुकुल, कारंजा लाड येथे स्व. अरुणाबाई भोरे स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरुकुल च्या विद्यार्थ्यांची व जेष्ठ नागरिकांचे नेत्र तपासणी करण्यात आली.
या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण ११२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या नेत्रतपासणी मध्ये चष्म्याचे योग्य नंबर काढून देण्यात आले. आपण आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो या साठी मार्गदर्शन करण्यात आले. बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू आजार आढळून आले. जेष्ठाना असलेल्या मोतियाबिंदू च्या ऑपरेशन संबधी समुपदेशन करण्यात आले. यातील काही रुग्णांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.
आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी माणिकचंदजी चवरे छात्रावास चे संचालक श्री पियुषभाऊ डोणगावकर, होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. भरतभाऊ भोरे, माजी सैनिक श्री. अतुल एकघरे, डॉ. उल्हास काटोले, डॉ. नितीन फाफट होते. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त श्री. परिमलभाऊ रुईवाले, श्री. प्रमोदभाऊ चवरे, श्री. सुहासभाऊ चवरे, श्री. प्रज्वल गुलालकारी उपस्थित होते. तसेच दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख, श्रीमती भारती तसरे, मोहम्मद नावेद आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
Comments