दिशा एज्युकेशन फाउंडेशन अमरावती व श्री भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव समिती, कारंजा द्वारा कारंजा (लाड) येथे १८२ नागरिकांची नेत्र तपासणी
दिशा एज्युकेशन फाउंडेशन अमरावती व श्री भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव समिती, कारंजा द्वारा आयोजित फिरते नेत्र चिकित्सालय रविवार दि ०५ मे २०२४ रोजी साधना भवन, मोठे श्री राम मंदिर जवळ, कारंजा (लाड) येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जेष्ठ नागरिक व मुलांचे नेत्र तपासणी करण्यात आली.
या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १८२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या नेत्रतपासणी मध्ये चष्म्याचे योग्य नंबर काढून देण्यात आले. आपण आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो या साठी मार्गदर्शन करण्यात आले. बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू आजार आढळून आले. जेष्ठाना असलेल्या मोतियाबिंदू च्या ऑपरेशन संबधी समुपदेशन करण्यात आले. या सोबतच कॉर्नियल ऑपॅसिटी असलेला व्यक्ती सुद्धा या शिबिरा मध्ये आढळून आले. यातील काही रुग्णांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.
या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करीत समितीचे अध्यक्ष अरविंद लाठिया, डॉ. अजय कांत, विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटरचे अध्यक्ष डॉ. शार्दूल डोणगावकर, श्री प्रज्वल गुलालकारी तसेच दिशा ग्रुपचे श्री स्वप्नील अरुण गावंडे, श्री हिमांशू बंड, अनिल देशमुख, श्रीमती भारती तसरे, मोहम्मद नावेद आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
Commentaires