दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा घाटलाडकी मध्ये १५८ नागरिकांची नेत्र तपासणी
दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात फिरते नेत्र चिकिसालय द्वारा अमरावती जिल्हा मधील धाटलाडकी या गावामधील श्री. विनायक देशमुख यांच्या वाढदिवसानीमीत्त शिवराव विद्यालय येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जेष्ठ नागरिक व मुलांचे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १५८ नागरिकांची तपासणी करण्यात आली ज्यामध्ये ५३ जेष्ठ नागरिकांची तर १०५ मुल होती. बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू व टेरेजियम आजार आढळून आले. या सर्वांना पुढील तपासणी साठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे.
या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन श्री. विनायक देशमुख, श्री. विलास काळे, तसेच दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, ऑप्थल्मिक ऑफिसर प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख, आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
नियमित नेत्र तपासल्यामुळे नेत्र संबधी अनेक आजाराचे योग्य वेळेत निदान होऊ शकते. त्यामुळे अश्या अनेक आजाराचे निदान करून व योग्य उपचारा वेळेत रुग्णाला प्राप्त झाला तर अश्या अनेक रुग्णाची दृष्टी जाण्यापासून आपण वाचवू शकतो. याच उद्देशाला लक्षात घेऊन दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात फिरते नेत्र चिकित्सालय द्वारे उपलब्ध करून देत आहे.
Comments