top of page
anildeshmukh

Deesha Group's Mobile Eye Care Unit conducted an Eye Checkup in Karanja Lad, Washim

दिशा एज्युकेशन फाउंडेशन अमरावती वलोकमान्य व्यायाम शाळा समिती, कारंजा व द्वारा कारंजा (लाड) येथे १७५ नागरिकांची नेत्र तपासणी



दिशा एज्युकेशन फाउंडेशन अमरावती व लोकमान्य व्यायाम शाळा समिती, कारंजा दिशा एज्युकेशन फाउंडेशन अमरावती द्वारा आयोजित फिरते नेत्र चिकित्सालय रविवार दि १५ सप्टेंबर २०२४ रोजी विठ्ठल रुख्मिणी मंदिर जवळ, कारंजा (लाड) येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जेष्ठ नागरिक व मुलांचे नेत्र तपासणी करण्यात आली.

Mobile Eye Care Unit conducting free eye checkup
Mobile Eye Care Unit conducting free eye checkup

या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १७५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या नेत्रतपासणी मध्ये चष्म्याचे योग्य नंबर काढून देण्यात आले. आपण आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो या साठी मार्गदर्शन करण्यात आले. बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू आजार आढळून आले. जेष्ठाना असलेल्या मोतियाबिंदू च्या ऑपरेशन संबधी समुपदेशन करण्यात आले. या सोबतच कॉर्नियल ऑपॅसिटी असलेला व्यक्ती सुद्धा या शिबिरा मध्ये आढळून आले. यातील काही रुग्णांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.



व्यायाम शाळेचे उपाध्यक्ष श्री. भीमरावजी गागरे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच शिबिराचे उद्घाटक म्हणून डॉ. श्री. राजेन्द्रजी संपट व डॉ. श्री. शार्दुल डोणगावकर यांची उपस्थिती लाभली व प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती सई ताई डहाके, डॉ. पंकज काटोले, नेत्रतज्ञ डॉ. सौ. पूजा राऊत व व्यायाम शाळाचे सचिव श्री. गोपाळराव वाघाडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विलास कथले यांनी केले डॉ. काटोले यांनी आपल्या भाषणामध्ये व्यायाम शाळा शतक महोत्सवानिमित्त घेत असलेल्या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच डॉक्टर शार्दुल डोणगावकर यांनी मरणोत्तर नेत्रदानाचे महत्त्व सांगून सर्वांना नेत्रदानाचा संकल्प घेण्याकरिता प्रोत्साहित केले. शिबिरामध्ये एकूण 175 नेत्र रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच लोकमान्य व्यायाम शाळा शतक महोत्सवी वर्षानिमित्त एकूण 100 सदस्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प घेतला. शिबिरामध्ये दिशा फाउंडेशनचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिबिरा दरम्यान माजी नगराध्यक्ष श्री दत्तराजजी डहाके, श्री विजयजी बगडे, डॉ. श्री. अजयजी कांत, डॉ. श्याम जाधव यांनी सदिच्छा भेट दिली. कार्यक्रमाकरिता लोकमान्य व्यायाम शाळेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, व सदस्य उपस्थित होते.

तसेच दिशा ग्रुपचे श्री स्वप्नील अरुण गावंडे, श्री हिमांशू बंड, अनिल देशमुख, श्रीमती भारती तसरे, मोहम्मद नावेद आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Comentarios


bottom of page