Deesha Group's mobile eye care unit provided quality eye check-ups at Karanja Lad in Washim district. more than 76 people underwent eye examination.
- anildeshmukh
- Feb 13
- 2 min read
दिशा इंटरनॅशनल आय बँक कडे वाढदिवसा निमित्ताने
आमदार सईताई प्रकाश डहाके यांनी घेतला नेत्रदानाचा संकल्प...
दिशा एज्युकेशन फाऊंडेशन अमरावती द्वारा संचालित फिरते नेत्र चिकित्सालय मध्ये बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी आदरणीय आमदार सईताई प्रकाश डहाके यांच्या वाढदिवसा निमित्ताने कृषक भवन, कृषी उत्पन्न बाजार समिती, कारंजा (लाड) येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आमदार सईताई प्रकाश डहाके यांनी वाढदिवसा निमित्ताने नेत्रदानाचा संकल्प सुद्धा घेतला.

या नेत्र तपासणी शिबिरामध्ये ७६ पेक्षा जास्त नागरिकांची तपासणी करण्यात आली. या नेत्रतपासणी मध्ये चष्म्याचे योग्य नंबर काढून देण्यात आले, व चष्मा वाटप सुद्धा करण्यात आले. तसेच आपण आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू आजार आढळून आले. जेष्ठाना असलेल्या मोतियाबिंदूच्या ऑपरेशन संबधी समुपदेशन करण्यात आले. या सोबतच कॉर्नियल ऑपॅसिटी असलेले व्यक्ती सुद्धा या शिबिरा मध्ये आढळून आले. यातील काही रुग्णांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.
या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करीत कारंजाचे आमदार सईताई प्रकाश डहाके, तसेच दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख, आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा ते आठ तसा पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामुळे मृत्युपच्यात ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरान कडून घेऊन घ्यावे.
मरनोतर नेत्रदानासाठी संपर्क करा दिशा इंटरनॅशनल आय बँक,यशोदा नगर अमरावती. मो. 9899898667, 8275539754, 7378656145 किवा स्वप्नील अरुण गावंडे - 9423424450. ऑनलाईन नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी भेट द्या www.deeshagroup.org.
Comments