Deesha International Eye Bank: Two Eye Donations in One Day
- anildeshmukh
- Jan 27
- 2 min read
दोन दिवसात अमरावती मध्ये दोन नेत्रदान
दोन परिवाराने सोपवले दिशा इंटरनॅशनल आय बँक कडे आपल्या परिजनांचे नेत्रकमल
अमरावती जिल्हा येथील रहिवासी स्व. श्रीमती वनमाला विनायक राहाते व स्व. श्रीमती कविता गोवर्धन राऊत यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. दोन्ही परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळला परंतु अशाही परिस्थितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने राहाटे परिवार व राऊत परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्रीमती वनमाला विनायक राहाटे व स्व. श्रीमती कविता गोवर्धन राऊत यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा एजुकेशन फाउंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डायरेक्टर डॉ. मनिष बबन तोटे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे राहाटे व राऊत कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. राहाटे व राऊत परीवाला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात राहाटे परिवाराचे श्री. राहुल राहाटे, श्री. निलेश भिंगारे, श्री. तेजस अरबट व राऊत परिवाराचे श्री. गोवर्धन सुंदरनाथ राऊत, श्रीमती अश्विनी ठाकरे, कु. प्राची ठाकरे व दोन्ही परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्रीमती वनमाला विनायक राहाटे व स्व. श्रीमती कविता गोवर्धन राऊत यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.

भारतासमोर अंधत्वाची एक मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कोर्नेअल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे. जसे मृत्यू नंतर सहा तासान पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामोळे मृत्यू नंतर ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. मरनोत्तर नेत्रदानासाठी संपर्क करा दिशा इंटरनॅशनल आय बँक, रसिक बिल्डिंग, आयकर ऑफिस मागे, अंबापेठ, अमरावती. मो. 9899898667, 8275539754, 7378656145 किवा स्वप्नील अरुण गावंडे - 9423424450. ऑनलाईन नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी भेट द्या www.deeshagroup.org
Comments