top of page
anildeshmukh

Garat Family Donated Eye of Late Durgabai Babanrao Garat in Deesha International Eye Bank Amravati

स्व. श्रीमती दुर्गाबाई बबनराव गरत यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान


शिव नगर, अमरावती येशील रहिवासी स्व. श्रीमती दुर्गाबाई बबनराव गरत याचे दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. गरत परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने गरत परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्रीमती दुर्गाबाई बबनराव गरत यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यानी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मारनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

गरत कुटुंबीयांनी स्व. श्रीमती दुर्गाबाई बबनराव गरत यांचे नेत्रकलम दिशा इंटरनॅशनल आय बँकेला सुपूर्त केले
गरत कुटुंबीयांनी स्व. श्रीमती दुर्गाबाई बबनराव गरत यांचे नेत्रकलम दिशा इंटरनॅशनल आय बँकेला सुपूर्त केले.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे गरत कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. गरत परीवाला नेत्रदाना केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात गरत परिवारातिल श्री. सुरेश गरत, श्री. सुनिल गरत, श्री. गजानन गरत, श्री. अनिल गरत, श्री. एकनाथ आगाशे, श्री. राजेंद्र शर्मा व गरत परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्रीमती दुर्गाबाई बबनराव गरत यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.

नेत्रदाता स्व. श्रीमती दुर्गाबाई बबनराव गरत
नेत्रदाता स्व. श्रीमती दुर्गाबाई बबनराव गरत

भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्तीचे  देखील नेत्रदान केले जाऊ शकते. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा ते आठ तसा पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामुळे मृत्युपच्यात ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरान कडून घेऊन घ्यावे.

मरनोतर नेत्रदानासाठी संपर्क करा दिशा इंटरनॅशनल आय बँक,यशोदा नगर अमरावती. मो. 9899898667, 8275539754, 7378656145 किवा स्वप्नील अरुण गावंडे - 9423424450. ऑनलाईन नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी भेट द्या www.deeshagroup.org.

Comments


bottom of page