दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकीत्सालयाद्वारे मनपा उच्च प्राथमिक शाळा क्र. १३,
चपरासीपुरा, अमरावती येथे १४७ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी
दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाउंडेशन, अमरावतीद्वारे संचालित फिरते नेत्र चिकीत्सालय द्वारे दि. ८ जानेवारी २०२५ रोजी चपरासीपुरा, अमरावती येथील मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. १३ मध्ये विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी अमेरिकेतील कॅलिफोर्निया मधून दिशा ग्रुपला भेट देण्यासाठी आलेले SAP या कंपनीचे मा. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) श्री अंबरीष मालपाणी व सौ. उमा मालपाणी प्रामुख्ण्याने उपस्थितीत होते. सोबत जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चित्रा खोब्रागडे, दिशा ग्रुपचे संस्थापक व सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या डॉ श्रद्धा ढाकुलकर व सर्व शिक्षक उपस्थित होते.
या शिबिरामध्ये एकूण १४७ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. योग्य चष्म्याचे नंबर काढून दिले गेले आणि डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. काही विद्यार्थ्यांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांचे विकार लवकर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कमी वयात डोळ्यांचे विकार ओळखले गेले तर त्यावर योग्य उपचार करून त्यांचे शैक्षणिक प्रदर्शन सुधारता येते, तसेच दीर्घकालीन अंधत्व टाळता येते. नेत्र तपासणीमुळे डोळ्यांची कमजोरी, रंगदृष्टीदोष आणि इतर समस्या त्वरित ओळखल्या जाऊ शकतात, ज्यामुळे मुलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण करत, याबाबतचे गैरसमज दूर केले. दिशा ग्रुपच्या ऑप्थल्मिक ऑफिसर कु. प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख यांसारख्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. भारतासमोर अंधत्व ही मोठी समस्या आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेल्या व्यक्तींनाही नेत्रदान करता येते. चष्मा असलेल्या किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तींनीही नेत्रदान करू शकते.
Comments