top of page
anildeshmukh

Insights from Our Eye Checkup Camp at Sategaon Village: Promoting Vision Health in Rural Communities

दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा सातेगाव, तालुका अंजनगाव सुर्जी, मध्ये १७९ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

 

दिशा एज्युकेशन फाउंडेशन अमरावती द्वारा संचालित फिरते नेत्र चिकित्सालय मध्ये दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी सातेगाव येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.

Deesha Group's Mobile Eye Care Unit Conducted an Eye Checkup in Sategaon
Deesha Group's Mobile Eye Care Unit Conducted an Eye Checkup in Sategaon

या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १७९ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या नेत्रतपासणी मध्ये चष्म्याचे योग्य नंबर काढून देण्यात आले. आपण आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो या साठी मार्गदर्शन करण्यात आले. काही रुग्णांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.

आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. गजानन वि. तायडे व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यपक श्री. राजेंद्र प्र. सिंगलवार व सर्व शिक्षक मंडळी उपस्थित होते. तसेच दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख, ऑप्थल्मिक ऑफिसर कु. प्रणाली चांभारे, आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.



भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्ती देखील नेत्रदान करू शकतात. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते.

Comments


bottom of page