top of page
anildeshmukh

Lunawat Family Donated Eye of Late Saroj Pravin Lunawat in Deesha Eye Bank Yavatmal

स्व. सरोज प्रविण लुणावत यांचे दिशा आय बँक मध्ये नेत्रदान

 

केसरीया भवन, लकडगंज, यवतमाळ येशील रहिवासी स्व. सरोज प्रविण लुणावत याचे दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. लुणावत परिवारावर सुद्धा दुःखाचा डोगर कोसळले परंतु अशाही परिस्थितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने लुणावत परिवाराच्या सदस्यांनी स्व. सरोज प्रविण लुणावत यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी यवतमाळ मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डायरेक्टर डॉ आशिष पोटफोळे, डॉ. विजय कावलकर यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदाता स्व. सरोज प्रविण लुणावत
नेत्रदाता स्व. सरोज प्रविण लुणावत

नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे लुणावत कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. लुणावत परिवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात लुणावत परिवारातिल श्री. प्रविण लुणावत, सेजल लुणावत, श्रीमती हर्षिता मालू व लुणावत परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. सरोज प्रविण लुणावत यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.

भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता. मरनोतर नेत्रदानासाठी संपर्क करा दिशा इंटरनॅशनल आय बँक, अंबापेठ अमरावती. मो. 9899898667, 8275539754, 7378656145 किवा स्वप्नील अरुण गावंडे - 9423424450. ऑनलाईन नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी भेट द्या www.deeshagroup.org.

 

Comments


bottom of page