The Inspiring Story of the Hajare: How Eye Donation Helped Others See the World
- anildeshmukh
- Mar 10
- 2 min read
स्व. श्री. प्रभाकर रामचंद्र हजारे यांचे
दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान
समर्थवाडी, यवतमाळ येशील रहिवासी स्व. श्री. प्रभाकर रामचंद्र हजारे यांचे दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. हजारे परिवारावर सुद्धा दुःखाचा डोगर कोसळले परंतु अशाही परिस्थितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने हजारे परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री. प्रभाकर रामचंद्र हजारे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी यवतमाळ मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डायरेक्टर डॉ. आशिष पोटफोळे, डॉ. आलोक गुप्ता यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे हजारे कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. हजारे परिवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात हजारे परिवारातिल श्री. दिपक हजारे, श्री. निलेश हजारे, श्री. विशाल काळे व हजारे परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री. प्रभाकर रामचंद्र हजारे यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.
भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.
Commentaires